आज मदनी (आमगाव) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारला (दि. ०२) वैद्यकीय जनजागृती मंच तर्फे बालकांच्या सर्व आरोग्य समस्या व युवकांच्या समस्या या बद्दल डॉ सचिन पावडे यांनी मार्गदर्शन केले.
वर्धा: आज मदनी (आमगाव) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारला (दि. ०२) वैद्यकीय जनजागृती मंच तर्फे बालकांच्या सर्व आरोग्य समस्या व युवकांच्या समस्या या बद्दल डॉ सचिन पावडे यांनी मार्गदर्शन केले.
या शिबीरात लहान मुलांची मोफत तपासणी व उपचार, मुलांच्या आहारा बाबत सल्ला व मार्गदर्शन,मुलांच्या लसिकरणाबाबत माहीती,बाल दमा या विषयी सल्ला व उपचार,नवजात शिशुंच्या समस्या व त्यांच्या संगोपना बाबत मार्गदर्शन केले व बालकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे प्रधान करण्यात आली.
यावेळी बालरोग तज्ञ संस्थापक अध्यक्ष वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. आनंद गाडवेकर, डॉ. सायरे सर, डॉ. निखिल ताल्लन यांनी बालकांची तपासनी केली.
या उपक्रम यशस्वीतेसाठी वैद्यकीय जनजागृती मंचसोबत इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपस्थित होते. व हा उपक्रम पूर्ण जिल्हा भर राबविण्यात येत आहे. हा उपक्रम आपल्या गावात घ्यायचा असेल तर वैद्यकीय जनजागृती मंचसोबत सोबत संपर्क साधा