दिनांक 7 जानेवारी 2024 रविवारला सकाळी 10.00 ते 01.00 या वेळेत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी योग भवन तहसील जवळ पुलगाव जिल्हा वर्धा येथे वय मर्यादा 15 वर्षे पर्यंतच्या मुलांचे मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज संघ नाचनगाव-पुलगाव
मुस्लिम कब्रस्तान इंतजामिया कमिटी पुलगाव, ऑल इंडिया लिनेस क्लब शाखा पुलगाव या तीन संघटनांच्या य संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण 765 बालकांची तपासणी व मार्गदर्शन करून मोफत औषधी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सचिन पावडे बालरोग तज्ञ, संस्थापक अध्यक्ष वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा हे होते. सोबतच मंचावर डॉ. मदन नांदुरकर, डॉ. हकीमुद्दीन बोहरा, डॉ. पियुष शाह, डॉ. आशय नितनवरे, डॉ. शहारे,सुधाकर गोरडे (अध्यक्ष धनगर समाज संघ नाचणगाव पुलगाव),सौ. राजश्री जमणारे (अध्यक्ष ऑल इंडिया लिनेस क्लब शाखा पुलगाव), हाजी निसार अहमद (अध्यक्ष मुस्लिम कब्रस्तान इंतजामिया कमिटी पुलगाव),डॉ. ज्ञानेश्वर रायपुरे,शेख पप्पू मूसारी (माजी अध्यक्ष),अय्यूब खान (उपाध्यक्ष)उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन संपन्न झाले. मंचावरील सर्व मान्यवरांचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी ऑल इंडिया लिनेस क्लब शाखा पुलगाव च्या टीमने सुंदर असे स्वागत गीत सादर केले. हाजी निसार अहमद यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,सुधाकर गोरडे यांनी धनगर समाज संघ नाचणगाव पुलगाव चे सामाजिक कार्यातील सहभागाबद्दल माहिती दिली.सौ.राजश्री जमणारे यांनी लिनेस क्लब शाखा पुलगावच्या स्थापनेच्या उद्देशाचे व कार्याचे बाबत माहिती सांगितली. अनंत बोबडे यांनी डॉ. सचिन पावडे सरांचा परिचय करून दिला. प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री.डॉक्टर सचिन पावडे सरांनी बालकांचे आजार, त्यांचा आहार, त्यांच्या सवयी आणि घ्यावयाची काळजी याबाबत मातापालकांना सविस्तर अशी माहिती दिली.* या शिबिराकरिता बालकांच्या नोंदणी करिता महेश आहुजा, शाकिब चौधरी, डॉक्टर रायपुरे,आरती साडी सेंटर, आहाना कलेक्शन, दीपक कावळे, शरद सावरकर,दिलीप भुजाडे, राजश्री जमणारे, शुभांगी डाखोरे,शिल्पा जाधव, प्रकाश साव यांनी भरपूर सहकार्य केले.नोंदणी झालेल्या व वेळेवर आलेल्या सर्व बालकांची उपस्थित सर्व डॉक्टर कडून शिबिरात तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. महाराष्ट्र वैद्यकीय प्रतिनिधी संघटना वैद्यकीय जनजागृती मंच व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या वतीने औषधी सर्व बालकांना मोफत औषधी व गोळ्या वितरित केल्या. उपस्थित पालकांनी असे शिबिर पहिल्यांदाच पुलगावात होत असून समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व पालक व बालकांना पारले बिस्किट, शेंगदाणा वडी व चहाचे वितरण आयोजकांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी राहुल डाखोरे (नवले मॅडम) सचिव-लिनेस क्लब शाखा पुलगाव यांनी केले असून आभार प्रदर्शन श्री.विजय ढगे (सचिव धनगर समाज संघ नाचनगाव-पुलगाव)यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिन्ही संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन- धनाने सहकार्य केले. शेवटी अल्पोहार व चहापान वितरणानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता संपन्न झाली.