वर्धा, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा परिषद, वर्धा,वैद्यकीय जनजागृती मंच,वर्धा,इंडियन रेड क्रॉस सोसायटी,वर्धा व बालरोग तज्ञ संघटना, वर्धा च्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील वर्धा,आर्वी,आष्टी, कारंजा,समुद्रपुर,हिंगणघाट व देवळी, सेलू तालुक्यातील ० ते ६ वर्ष वयोगटातील तिव्र व अति तिव्र कुपोषीत बालकांची तपासणी व औषधोपचार दि.१७ मार्च २३ ते दि.२ एप्रिल ह्या कालावधीत करण्यात आली होती.
तिन महिण्याचा कालावधी नंतर पुर्नतपासणी आज दिनांक ८/०८/२०२३ ला आरोग्यवर्धनी उपकेंद्र कोटंबा अंतर्गत कोटंबा येथील अंगणवाडी केंद्रात कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणी अंतर्गत 1 तिव्र, उंचीनुसार मध्यम(SAM/MAM) 2 तसेच सर्व साधारण 61 एकूण 64 बालकांची तपासणी बालरोगतज्ञ डॉ सचिन पावडे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाडीभस्मे यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती रेणुका ताई कोटंबकर सरपंच कोटंबा ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.तपासणी नंतर लाभार्थ्यांना चिक्की व मल्टी व्हिटॅमिन औषध देण्यात येऊन पालक वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका , ह्यांना पल्स ऑक्सिमिटर देण्यात आले. कार्यक्रमाला रेड क्रॉस इंडियन सोसायटी चे सचिव श्याम भेंडे, सचिन गरपाळ, यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु . दिपाली कडू सामुदायिक आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवक श्री. शरद हिंदोळे आरोग्य सेविका श्रीमती . सुनिता वाढवे . अंगणवाडी सेविका , सर्व इतर कर्मचारी उपस्थित होते.
ह्या पुढील तपासणी शिबिर ज्या गावात आयोजित करायचे आहे त्या गावातील आशा/अंगणवाडी सेविका ह्यांनी वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा व इंडियन रेड क्रास सोसायटी, वर्धा ह्यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले