वर्धा, दि. 27 जुलै २०२३ रोजी जिल्हा परिषद, वर्धा,वैद्यकीय जनजागृती मंच,वर्धा,इंडियन रेड क्रॉस सोसायटी,वर्धा व बालरोग तज्ञ संघटना, वर्धा च्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील वर्धा,आर्वी,आष्टी, कारंजा,समुद्रपुर,हिंगणघाट व देवळी, सेलू तालुक्यातील ० ते ६ वर्ष वयोगटातील तिव्र व अति तिव्र कुपोषीत बालकांची तपासणी व औषधोपचार दि.१७ मार्च २३ ते दि.२ एप्रिल ह्या कालावधीत करण्यात आली होती.
तिन महिण्याचा कालावधी नंतर पुर्नतपासणी आज दिनांक २६/०७/२०२३ ला प्रा.आ.केंद्र झडशी उपकेंद्र झडशी अंतर्गत अंगणवाडी क्र.33,107,124,मिनी अंगणवाडी तसेच गिरोलि अंगणवाडी क्र .134, हिवरा अंगणवाडी क्रं 43 यामधील कुपोषित बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणी अंतर्गत 26 मध्यम, 07तिव्र, उंचीनुसार मध्यम(SAM/MAM) 09 तसेच सर्व साधारण 108 एकूण 141बालकांची तपासणी बालरोगतज्ञ डॉ सचिन पावडे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाडीभस्मे डॉ.आनंद गढवकर यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती,शुभांगीताई हळदे सरपंच तसेच कैलाश भाऊ दळणे उपसरपंच झडशी. ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.तपासणी नंतर लाभार्थ्यांना चिक्की व मल्टी व्हिटॅमिन औषध देण्यात येऊन पालक वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले. आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका ह्यांना पल्स ऑक्सिमिटर देण्यात आले. कार्यक्रमाला रेड क्रॉस इंडियन सोसायटी चे सचिव श्याम भेंडे, सचिन गरपाळ यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.शुभम जयसिंगपुरे वैद्यकिय अधिकारी , आरोग्य सहाय्यक श्री. गजानन धानकुटे , उत्तम के.उंदीरवाडे आरोग्य सेवक श्री. आरोग्य सहायिका श्रीमती . ज्योती ठाकरे, श्रीमती. शिला गाठे..आरोग्य सेविका रेखा सिंधीकर ..परिचर.कोमल तांबूले रत्नाकर हिवरे..सफाई कामगार विशाल मल्लिक..रुपाली खोबे
अंगणवाडी सेविका श्रीमती कोहोळे,शेळके,गव्हाले, येल्लोरे,आणि आशा कार्यकर्ती शिवरकर, उडाण , तेलतुंभले,सोमंनकर इत्यादींनी सहकार्य केले