वर्धा, दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी वैद्यकीय जनजागृती मंच, इंडीयन रेड क्रॉस सोसायटी व जिल्हा प्रशासन वर्धा च्या वतीने मागील ८ वर्ष्या पासुन निर्मळ गणेश विसर्जन चे आयोजन व्ही.जे.एम्स. ऑक्सिजन पार्क हनुमान टेकडी,आर्वी रोड,पिपरी (मेघे),वर्धा येथे करण्यात येते. या वर्षी दिड दिवस ते अनंत चतुर्दशी पर्यंत आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. पंकज भोयर आमदार, वर्धा, प्रमुख अतिथी मा.राहुल कर्डिले जिल्ह्याधिकारी, वर्धा तसेच मा. नुरूल हसन पोलीस,अधिक्षक वर्धा, मा.सचिन तडस, जिल्हा शल्य चिकीत्सक वर्धा, मा. रा.ज. पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी,वर्धा, मा. रमेश कोळपे. तहसीलदार, वर्धा , मा. वैशाली गौळकर सरपंच,पिपरी (मेघे), मा. गजानन वानखेडे, उप सरपंच, मा.अजय गौळकर, मा.वैभव चाफले, मा.किर्ती खंडारे, मा.संदीप कुत्तरमारे, सदस्य ग्रा.प.पिपरी (मेघे), मा. पप्पू मोरे, माजी प.स. सदस्य, ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
या वर्षी गणेशोत्सवाच्या दिड दिवसा पासुनच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली होती व शेवटच्या दोन दिवसात २१५७ गणेश मुर्तीच्या विसर्जनाची नोंद झाली. निर्मळ गणेश विसर्जन तसेच मंचाच्या इतर उपक्रमास नेहमी मदत करणाऱ्या सौ. वैशाली गौळकर, सरपंच, श्री पंकज चांडक, शासकीय कंत्राटदार, श्री प्रफुल्ल मोरे, माजी प.स.सदस्य, श्री प्रशांत खंडारे, माजी ग्रा.प. सदस्य, श्री गजानन भांगे, मुर्तीकार, श्री विनोद भोरे, इलेक्ट्रीशियन, श्री,श्याम ठाकरे, वाहन चालक ह्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय जनजागृती मंच चे अध्यक्ष डॉ.सचिन पावडे, संचालन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव श्याम भेंडे व आभार प्रदर्शन श्री अनंत बोबडे ह्यांनी केले.
गणेश विसर्जन सोहळ्या करीता वैद्यकीय जनजागृती , इंडीयन रेड क्रॉस सोसायटीचे सर्व सदस्यांनी आर्थीक मदत केली आणि अथक परिश्रम घेतले तसेच ग्रामपंचायत पिपरी (मेघे) व जिल्हा प्रशासन,वर्धा ह्यांनी मोलाचे सहकार्य केले