Causes Details

causes details

वैद्यकीय जन जागृती मंच 9 वा वर्धापन दिन

मी ही समाजाच काही देणं लागतो ह्या ब्रिदवाक्याला न्याय देत आजपर्यंत अनेक आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रमे राबविण्यात आली.

दिनांक 5 नोव्हेंबर 2014 ला VJM ची स्थापना झाली. बघता बघता 9 वर्षे पूर्ण झाली. ह्यावर्षी VJM ने सन्मान सोहळा घेऊन 9 वा वर्धापन दिन साजरा केला. ह्यात वर्धेतील 22 सामजिक संघटनांचा सत्कार करण्यात आला. ह्यातील अनेक संस्था आताच प्रस्थापित होऊन उत्तम समाजकार्य त्यांच्या हातून घडत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खासदार मा. श्री रामदासजी तडस साहेब हे होते. प्रमुख उपस्थिती वर्धेचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले, प्रजापिता ब्रह्मकुमारी माधुरी दीदी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ स्मिता पावडे होत्या. प्रास्ताविक VJM चे अध्यक्ष डॉ सचिन पावडे ह्यांनी मांडले. VJM चा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यात वर्धेतील एका हाकेवर सोबत काम करायला तय्यार असणाऱ्या वर्धेतील विविध सामाजिक संस्था ह्यांचा साथ ह्याबद्दल आभार मानले.

details
details

प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले ह्यांनी वर्धेतील सर्व सामाजिक संघटना किती उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन कामे करतात ह्याबद्दल सर्वांचे कौतुक केले आणि VJM ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माधुरी दीदी ह्यांनी सामाजिक कार्य करताना वैचारिक आणि आध्यात्मिक बाबींकडे पण लक्ष देण्याबाबत सांगितले. आत्मिक शांती आपल्याला आणखी नवीन कार्य करण्याची क्षमता वाढविण्यात मदत करते. असे त्या पुढे म्हणाल्या. अध्यक्षीय भाषणात आदरणीय खासदार रामदासजी तडस साहेब ह्यांनी VJM च्या सर्व आरोग्यविषयक आणि अनेक सामाजिक उपक्रमांची प्रशंसा केली आणि भविष्यात शासन आणि प्रशासन सदैव तुमच्या कार्यात सहभागी राहील अशी ग्वाही दिली. त्यांनी VJM अध्यक्ष डॉ सचिन पावडे ह्यांचे विशेष कौतुक केले की तुमची निर्णयक्षमता, सृजनशीलता आणि तत्परता ह्या गुणांमुळे वर्धेतील सर्वच सामाजिक संस्था आणि जनता ह्यांना एकत्र बांधता आले. त्यांनी शेवटी VJM ला भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले

ह्यात वर्धा जिल्ह्यातील 22 समाजसेवी संघटनेचा समवेश होता ह्यात

1. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद वर्धा

2. वीर भगत सिंग संस्था सेलू-

3. ABC गृप वर्धा

4. शिवनेरी गृप हिंगणी-

5. आपले सरकार

6. वर्धा प्लॉगर्स आणि सानिध्य संस्था वर्धा

7. YCR गृप वर्धा

8. MSMRA वर्धा

9. अनिकेत समाजकार्य विद्यालय

10. मेहेर समाजसेवी संस्था वर्धा

11. विवेकानंद केंद्र वर्धा

12. सेवा फौंडेशन वर्धा

13. शिवराया विद्यार्थी संघटना महाराष्ट्र

14. जिव्हाळा सेवाभावी संस्था वर्धा

15. युवा संघर्ष मोर्चा देवळी

16. जिल्हा अन्नदान समिती

17. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालय वर्धा

18.महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा

19. आधारवड वर्धा

20. पवन सूत हनुमान ट्रस्ट वर्धा

21. कबीर फाउंडेशन

22. वर्धा विभाग मोहीम

ह्या संघटनांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती तहसीलदार श्री रमेश कोळपे, श्री धर्माधिकारी, डॉ अभ्युदय मेघे, श्री शेखर शेंडे, श्री समीर देशमुख, श्री संजय इंगळे तिगावकर, Adc. अशोक पावडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत वाडीभस्मे आणि डॉ आनंद गाढवकर ह्यांनी केले.

संगीत महाफील सप्तरंग म्युझिकल गृप श्री आनंद निधेकर ह्यांच्या संगीत मंचाने केले आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.

आभार प्रदर्शन श्री श्याम भेंडे ह्यांनी केले आणि आलेल्या सर्वांसाठी VJM ने जेवणाची व्यवस्था पण द इव्हेंट्स हॉल मध्ये केली होती.

VJM च्या ह्या 9 व्या वर्धापनदिनाची सुरुवात वैद्यकीय जनजागृती मंचाचा विस्तारित परिवार मातोश्री वृद्धश्रम 30, शारदा मूक बधिर विद्यालय 60, आसमंत स्नेहालय 30 असे एकूण 120 विद्यार्थ्यांना आशियाड सर्कसचा आनंद देऊन करण्यात आला.

VJM च्या सर्वच सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.