वर्धा, दि. ३० जुलै २०२३ रोजी , वैद्यकीय जनजागृती मंच,वर्धा तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, वर्धा तर्फे व्ही.जे.एम्स. ओ-२ पार्क हनुमान टेकडी.आर्वी रोड, पिपरी (मेघे), वर्धा येथे १३ व्या व्ही.जे.एम्स. जलद घन वन लागवडीचा शुभारंभ मा.राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा, मा.राकेश सेपट, उप वन संरक्षक, वर्धा, मा.दिपक करंडे, उप विभागीय अधिकारी, वर्धा, मा.रमेश कोळपे,तहसीलदार, वर्धा,मा. वैशाली गौळकर,सरपंच पिपरी (मेघे), मा.गजानन वानखेडे, उप सरपंच पिपरी (मेघे), डॉ. सचिन पावडे, अध्यक्ष वैद्यकीय जनजागृती मंच ह्यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाले.
वैद्यकीय जनजागृती मंच च्या वतीने सन् २०१६ पासुन हनुमान टेकडीवर मागच्या वर्षी पर्यंत १२ मियावाकी सह २१००० रोप लावलेली असुन ह्या वर्षी २००० रोप लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. मंचाचे सदस्य दररोज सकाळी ६ ते ९ वाजे पर्यंत संगोपन करीत असतात त्यामुळे ९०% झाड जिवंत असुन झाडाची उंची जवळपास १० ते १५ फुट झालेली आहे. आज अनेक वर्धेकर सकाळ संध्याकाळ टेकडीवर फिरायला येतात व शुद्ध ऑक्सिजन चा लाभ घेतात. सदर लागवड पुढील १५ दिवस करण्यात येणार असुन जास्तीत जास्त संखेनी वर्धेकरांनी सकाळी ६ ते ९ पर्यंत उपस्थित राहुन सहकार्य करावे असे आवाहन मंच वतीने करण्यात आलेले आहे.
आजच्या कार्यक्रमा करीता ग्राम पंचायत पिपरी (मेघे)चे सदस्य वैद्यकीय जनजागृती मंच, इंडियन रेड क्रॉस सोसायटी,जय हिंद फाउंडेशन, वर्धा चे पदाधिकारी ,सदस्य व परीसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्चित होते