Causes Details

causes details

धाम नदी परिसरात सफाई अभियान

एक पाऊल स्वछतेकडे... मग ती जल, वायू किव्वा जमीन कुठलीही असो... पुढाकार हा घ्यावाच लागतो. आज मंगळवार दि 27 जून 2023 ला सकाळपासून पवनार आश्रम परिसरात वर्धेकर आणि पवनार वासीयांनी गर्दी करायला सुरुवात केली. एकच ध्यास मनात होता तो म्हणजे धाम नदी जल प्रदूषण कमी करणे

जिल्हा प्रशासन वर्धा आणि वैद्यकीय जन जागृती मंच तसेच वर्धेतील अनेक सामाजिक संघटनेने ह्यात हिरीरीने सहभाग नोंदवला. युवकांपासून तर वृद्धांपर्यंत सर्व जण धाम नदी पात्र स्वच्छ करण्यात दंग होते. बघता बघता 2 ट्रॅक्टर ट्रॉली आणि बऱ्याच कचरागाड्या प्लास्टिक आणि इतर टाकाऊ वस्तूंन्नी तुडुंब भरल्या.

उपस्थित सर्वांना समाधान मिळत होते की आपण आज छोट्या स्वरूपात का होईना पण सुरुवात तर केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले स्वतः स्वछता अभियानात उतरले आणि शेवटपर्यंत कार्यरत होते. सोबत तहसीलदार वर्धा, रमेश कोळपे, गट विकास अधिकारी निशिकांत शिंदे, पवनार येथील सरपंच सौ.शालीनी आदमने,माजी सरपंच श्री अजय गांडोळे,माजी प.स. वर्धा सदस्य श्री प्रमोद लाडे व सर्व सन्मा. ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे आणि सदस्यांनी पुढाकार घेऊन हे आयोजन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

details
details

वर्धेतील सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य नर्मदा फाऊंडेशन, वर्धा च्या मागील चार वर्षा पासुन करीत असलेले धाम नदी स्वच्छता अभियानाला हातभार लावत होते. ह्यात वैद्यकीय जन जागृती मंच,वर्धा, जनहित मंच, , आपले सरकार,वर्धा, निसर्ग सेवा समिती, वर्धा, सानिध्य फौंडेशन, वर्धा, रोटरी क्लब गांधी सिटी, वर्धा, रेडिअन्स अकॅडमी,वर्धा, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, वर्धा, ओ बी सी जनजागृती संघटन, वर्धा, म.रा.शि क्षक परिषद तक्रार निवारण समिती, वर्धा, मेहेर बाबा सेवाभावी संस्था,वर्धा, आधारवड, वर्धा, वर्धा प्लॉगर्स, जवान डिफेन्स अकॅडेमी, वर्धा, नेहरू युवा केंद्र,वर्धा, वर्धा सोशल फोरम, यंग सायकल रायडर,वर्धा,युवा सोशल फोरम, वर्धा, मशानकर कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी, ग्रामपंचायत पवनार येथील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि अनेक लोकांनी स्वच्छता अभियानात मदत केली.

वैद्यकीय जन जागृती मंच तर्फे श्रमदात्यांसाठी पाणी आणि चहा ची व्यवस्था पण करण्यात आली होती.