Causes Details

causes details

कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती मोहीम

आज दिनांक 13/09/2023 रोज बुधवार ला यशवंत हायस्कूल झडशी ता सेलू जी वर्धा येथे सुजाता ताई हळदे सरपंच झडशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वैद्यकीय जनजागृती मंच व सार्वजनिक आरोग्य विभाग सेलू तसेच ग्राम पंचायत झडशी मार्फत विद्यार्थ्यांना कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती मोहीम घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ.सचिन पावडे बाल रोग तज्ञ वर्धा यांनी कीटकजन्य( डेंग्यू& स्क्रब टायफस ) आजाराविषयी मार्गदर्शन करून या आजाराबाबत आपले रक्षण कसे करता येईल या बाबत मार्गदर्शन केले.तसेच कीटकजन्य व जलजन्य आजाराची प्रतिबंधात्मक शपथ डॉ आनंद गाढवकर यांनी दिली.तसेच आरोग्य विभागाच्या आजपासून प्रारंभ होत असलेल्या आयुष्मान भव या मोहिमअंतर्गत अवयवदान करण्यासंबंधी शपथ डॉ मनीषा रेवतकर वैद्यकीय अधिकारी प्राआकेंद्र झडशी यांनी दिली.तसेच मोहिमेविषयी संपूर्ण माहितीडॉ प्रशांत वाडीभस्मे तालुका आरोग्य अधिकारी सेलू यांनी दिली.तसेच सर्व उपस्थिताना कीटकजन्य आजाराविषयी जनजागृतीचे प्रचार पत्रक वाटप करण्यात आले.

 

details

यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक गजानन धानकुटे , उत्तम उंदीरवाडे आरोग्य सेवक झडशी .तसेच वाटाणे सर मुख्याध्यापक यशवंत विद्यालय झडशी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.