जिल्हा परिषद, वर्धा,वैद्यकीय जनजागृती मंच,वर्धा,इंडियन रेड क्रॉस सोसायटी,वर्धा व बालरोग तज्ञ संघटना, वर्धा च्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील वर्धा,आर्वी,आष्टी, कारंजा,समुद्रपुर,हिंगणघाट व देवळी तालुक्यातील ० ते ६ वर्ष वयोगटातील तिव्र व अति तिव्र कुपोषीत बालकांची तपासणी व औषधोपचार दि.१७ मार्च २३ ते दि.२ एप्रिल ह्या कालावधीत करण्यात आली होती. तिन महिण्याचा कालावधी नंतर आज दिनांक ०४/०७/२३ ला आरोग्यवर्धनी उपकेंद्र घोराड अंतर्गत अंगणवाडी क्र.१११ येथे वैद्यकीय जनजागृती मंच अध्यक्ष व बालरोग तज्ञ मा. डॉ. सचिन पावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाडिभस्मे,डॉ.आनंद गाढवकर, डॉ.निखिल ताल्हन, डॉ.विलास जोशी, ह्यांनी २तिव्र, २३ मध्यम, ४८ सर्वसाधारण एकूण ६३ बालकांची तपासणी केली. तपासणी नंतर लाभार्थ्यांना चिक्की व मल्टी व्हिटॅमिन व औषधोपचार करण्यात आला तसेच पालक वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले. ह्यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव श्री श्याम भेंडे, श्री सचिन गरपाळ, श्री मंगेश दिवटे, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी. एच. ओ. डॉ.मोनाली पिसे, आरोग्यसेवक श्री शंभरकर, आरोग्य सेविका बावणे, अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती यशोधरा पाटील व सर्व अंगणवाडी सेविका सर्व आशा कार्यकर्ती इत्यादींनी सहकार्य केले.
ह्या पुढील तपासणी शिबिर ज्या गावात आयोजित करायचे आहे त्या गावातील आशा/अंगणवाडी सेविका ह्यांनी वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा व इंडियन रेड क्रास सोसायटी, वर्धा ह्यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.