वर्धा : दिनांक १६ नोव्हेम्बर २०२३ रोजी वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा ला जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, शासनाच्या विविध विभाग, जिल्ह्यातील सामाजिक व स्वयंसेवी संस्स्थां सोबत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी तसेच पोलीस विभाग वर्धा सोबत कार्य केल्या बाबत पोलीस अधिक्षक कार्यालया मध्ये प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मा. नुरुल हसन, पोलीस अधिक्षक, वर्धा, मा. सागर कवडे, अत्तिरिक्त पोलीस अधिक्षक, वर्धा व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय जनजागृती मंच, वर्धा च्या वतीने डॉ.सचिन पावडे, अध्यक्ष, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, सहसचिव, डॉ.आनंद गाढवकर, कोषाध्यक्ष, सदस्य श्री मोहन मिसाळ, श्री मंगेश दिवटे, श्री सचिन गरपाळ, श्री श्याम भेंडे ह्यांनी सन्मान स्विकारुन पोलीस विभागाला धन्यवाद देतांना डॉ. सचिन पावडे ह्यांनी ह्यापुढेही वैद्यकीय जनजागृती मंच जिल्हा प्रशासन व पोलीस विभागा सोबत कार्य करण्याचे आश्वासन दिले तर मा. नुरुल हसन सर ह्यांनी मंचाच्या समाजपयोगी उपक्रमांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या